'आमचा मोडलेला साखरपुडा आजही...';20 वर्षांनी अक्षयबरोबरच्या अफेअरबद्दल बोलली रवीना
अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा साखरपुडा झाला होता मात्र काही कारणांमुळे दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 20 वर्षांनंतर अक्षयबरोबरच्या ब्रेकअपबाबत रवीना काय म्हणालीये पाहा.
दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात यायचं.
3/ 11
त्या वेळी अक्षय कुमारचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. पण रवीनाबरोबरच्या नात्यात अक्षय खूप पुढे निघून गेला होता.
4/ 11
अक्षय आणि रवीना यांचा साखरपुडा देखील झाला होता मात्र त्यांचं लग्नापर्यंत जाऊन मोडलं.
5/ 11
त्यानंतर मात्र रवीना आणि अक्षय कुमार कधीच एकमेकांबरोबर दिसले नाहीत. पण आता अनेक वर्षानी दोघांच्या नात्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्यात.
6/ 11
एका मुलाखतीत रवीनाला त्यांच्या साखरपुड्याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा तिनं सगळ्यावर सडेतोड उत्तर दिलं.
7/ 11
ANIच्या पॉडकास्टमध्ये रवीनानं अक्षयबरोबरच्या अफेअर्सची बिनधास्त उत्तरं दिली. ती म्हणाली, 'अक्षय बरोबरच्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर मी दुसऱ्या कोणाला डेट करत होते आणि तो सुद्धा. मग मी याचा राग का करू'.
8/ 11
'अक्षय आणि माझा कधीकाळी साखरपुडा झाला होता हे देखील मी विसरले आहे. अक्षयबरोबरच्या नात्यातून बाहेर आल्यानंतर मी हे प्रकरण आणि त्या संबंधी येणाऱ्या बातम्यांपासून स्वत:ला दूर ठेवलं होतं'.
9/ 11
'माझं आणि अक्षयचं अफेअर होतं. आमचा साखरपुडा झाला होता हेही आता मला आठवत नाही. मी या सगळ्यातून बाहेर आले आहे. पण लोक आजही जुन्या गोष्टी उगाळत बसले आहेत'.
10/ 11
'लोक घटस्फोट घेतात आणि मुव्ह ऑन होतात. मग आमचा तर साखरपुडा मोडला होता त्यात विशेष काय आहे, असं रवीना म्हणाली'.
11/ 11
तसंच 'आम्ही आता कधीकधी पल्बिकली भेटतो तेव्हा आनंदानं एकमेकांना भेटतो. खूप बोलतो. प्रत्येकजण आयुष्यात पुढे गेला आहे. आतातर कॉलेजमध्ये मुली देखील आठवड्याला बॉयफ्रेंड बदलतात. पण आमचा मोडलेला साखरपुडा आजही लोकांच्या डोक्यात आहे', असही रवीना म्हणाली.