रात्रीस खेळ चाले ही छोट्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Rutuja Dharmadhikari/Instagram) गूढ कथानक आणि अण्णा नाईक यांची दहशत यामुळं ही मालिका अल्पावधिच लोकप्रिय झाली. (Rutuja Dharmadhikari/Instagram) सध्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचं तीसरं पर्व सुरु आहे. अन् ते देखील तितक्याच आवडीनं पाहिलं जातं. (Rutuja Dharmadhikari/Instagram) या मालिकेतील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. परंतु यामध्ये ऋजुता धर्माधिकारी हिनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. (Rutuja Dharmadhikari/Instagram) ती रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या सीझनमध्ये झळकली होती. (Rutuja Dharmadhikari/Instagram) यामध्ये तिनं शेवंताची मुलगी सुशीला ही व्यक्तिरेखा साकारली होती. (Rutuja Dharmadhikari/Instagram) तिच्यामुळं नाईक कुटुंबात खुपच वाद पेटतात. कारण ती अण्णा नाईक यांची मुलगी असते असं कथानक दाखवण्यात आलं होतं. (Rutuja Dharmadhikari/Instagram) रात्रीस खेळ चालेनंतर ऋजुता बिग बॉस मराठीमध्ये देखील झळकली होती. (Rutuja Dharmadhikari/Instagram) मालिकांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Rutuja Dharmadhikari/Instagram) ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायमच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. (Rutuja Dharmadhikari/Instagram)