'रात्रीस खेळ चाले 2' फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आपल्या सुंदर फोटोंमुळे खुपचं चर्चेत आहे. अपूर्वा नुकताच काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. फोटो पाहून कोणी तिच्या नथीची चर्चा करत आहे, तर कोणी तिच्या मादक डोळ्यांची. एका युजरने तर अपूर्वाची नथ बघून म्हटलं, 'मला तुमची नथ पाहून माझ्या एक्सची आठवणझाली'. तर आणखी काही युजर्सनी म्हटलं आहे, 'तुझी एक झलक पाहून, सगळं टेन्शन दूर पळत'. रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेमुळे अपूर्वा घराघरात पोहचली आहे. या मालिकेतील अण्णा आणि शेवंताच्या लव्हस्टोरीने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. या मालिकेत नेहमी साडीमध्ये दिसलेली शेवंता, आपल्या रियल लाईफमध्ये खुपचं बोल्ड आणि स्टाईलिश आहे. अपूर्वा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपले हटके फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करता असते. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते भरभरून लाईक्स देत असतात. तसेच चाहते विविध कमेंट्स सुद्धा करत असतात. अपूर्वा नेहमीच हटके लुकमध्ये फोटोशूट करत असते. साडी असो किंवा वेस्टर्न लुक अपूर्वा सगळ्यातचं खुलून दिसते. अपूर्वा खाण्याची खुपचं शौकीन आहे. शेवंताने मालिकां शिवाय काही चित्रपटांमध्ये सुद्धा काम केल आहे. 'बाराखडी 7 किमी.' या चित्रपटातून तिने पदार्पण केल होतं. अपूर्वाच्या या मनमोहक रूपानेच ती चाहत्यांना घायाळ करत असते.