रसिका सुनील ही अभिनेत्री सध्या नवरा आदित्य बिलागीसोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. रसिका सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि नवनवे फोटोशूट सुद्धा करत असते. रसिकाने नुकतंच एका खणाच्या साडीमध्ये फोटोशूट केल्याचं दिसून आलं आहे. या खणाच्या साडीचं चाहत्यांनी बैलपोळा सणाशी नातं जोडत त्यावर चक्रावून टाकणाऱ्या कमेंट करायला सुरुवात केली आहे. एक युजर असं लिहितो, ‘बैल पोळा २६ ऑगस्ट रोजी आहे. तेव्हा एकदम भारी वाटेल.” रसिकाने परिधान केलेल्या साडीवर पिचवाई पद्धतीने काढलेलं सुंदर नक्षीकाम आहे. त्यामध्ये बैलाचं चित्र असल्याने चाहत्यांनी त्याचं कनेक्शन बैलपोळा सणाशी जोडत कमेंट केली आहे. रसिका या आगळ्या वेगळ्या साडीच्या लुकमध्ये खूपच खुलून दिसत असल्याचं कमेंटमध्ये म्हणलं जात आहे.