नॅशनल क्रश म्हणून साऊथ अभिनेत्री रश्मिकाला ओळखलं जातं. फारच कमी वेळेत अभिनेत्रीने अफाट यश मिळवलं आहे.
2/ 8
रश्मिकाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. परंतु ही अभिनेत्री एका खास व्यक्तीची चाहती आहे.
3/ 8
रश्मिका साऊथ सुपरस्टार थालापती विजयची मोठी चाहती आहे. फक्त चाहतीच नव्हे तर अभिनेत्यावर तिला क्रशसुद्धा आहे.
4/ 8
नुकतंच रश्मिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले आणि विजयचे काही फोटो शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे.
5/ 8
अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलंय, ''ठीक आहे, आता काहीतरी वेगळं जाणवत आहे. सरांना वर्षानुवर्षे पाहात आहे'.
6/ 8
''आणि मला नेहमीच त्यांच्यासोबत जे करायचं होतं अर्थातच डान्स, अभिनय, मजा,त्यांची नजर काढणं ते मी आता करू शकते. एक संपूर्ण आनंद''. असं म्हणत रश्मिकाने आपल्या आवडत्या अभिनेत्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.
7/ 8
रश्मिका लवकरच मास्टर फेम विजयसोबत चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच त्याचं शूटिंग सुरु झालं आहे.