

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांच्या फॅन्सना आनंद झाला असेलच. याशिवाय त्यांनी लग्नाच्या तारखेवरसु्द्धा शिक्कामोर्तब केला आहे. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत लग्नाची तारीख कळवली आहे.


लग्नपत्रिका सोशल मीडियावर शेअर करताच ती व्हायरल झाली. रणवीर-दीपिकाचा लग्नसोहळा दोन दिवस असणार आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर त्यांच्या लग्नाची तारीख आहे. ही तारीख निवडण्यामागे कारण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 15 नोव्हेंबर 2013 रोजी त्यांचा पहिला सिनेमा ‘गोलियो कि रासलिला रामलिला’ हा प्रदर्शित झाला होता.


दीपिका आणि रणवीरने रविवारी (21 ऑक्टोबर) दुपारी लगनपत्रिका शेअर केली. इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये पत्रिका शेअर केली आहे. पत्रिकेची मांडणी अगदी साधी आहे. क्रिम रंगाच्या बॅकग्राऊंडवर सोनरी रंगाच्या शब्दात मजकूर लिहिला आहे. पण या पत्रिकेतून त्यांनी लग्नाबाबत जास्त माहिती दिली नाही. फक्त लग्नाच्या तारखेबद्दल सांगण्यात आलं आहे.


रणवीर आणि दीपिकानं शेअर केलेल्या पत्रिकेत चुका असल्याचं युजर्सला दिसून आलं आहे. ज्यात युजर्सचं म्हणणं आहे की, लग्नपत्रिकेत हिंदी भाषेनुसार व्याकरणाच्या चुका आहेत. त्यात केलेला ‘की’ चा उल्लेख हिंदी भाषेत ‘कि’ असा होतो आणि दीपिकाच्या नावाची वेलांटी ‘दिपिका’ अशी होते. काही युजर्सला वाटते की, इंग्रजीमधील मजकूर हिंदीत शब्दांतर करण्यासाठी ट्रान्सलेटरचा वापर केला आहे.