छोट्या कार्तिकीची सोशल मीडियावरही हवा! 'रंग माझा वेगळा'तील ही चिमुकली आहे तरी कोण?
'रंग माझा वेगळा' ही छोट्या पदड्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नुकताच काही वर्षांचा लीप घेण्यात आला आहे. लीपनंतर मालिकेत काय बदल होणार? मालिका नेमकी कोणत्या वळणावर जाऊन पोचणार हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
'रंग माझा वेगळा' ही छोट्या पदड्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत नुकताच काही वर्षांचा लीप घेण्यात आला आहे. लीपनंतर मालिकेत काय बदल होणार? मालिका नेमकी कोणत्या वळणावर जाऊन पोचणार हे पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
2/ 6
काही वर्षांच्या लीपनंतर मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही गोंडस मुली आत्ता मोठ्या झाल्या आहेत. या मुलींचे प्रोमो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलार आहे साईशा भोईर
3/ 6
साईशा ही मूळची कल्याणची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्य या सर्वांची आवड आहे. ती सतत घरी, शाळेत नृत्य करत असते. दरम्यान तिच्या आईला 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या ऑडिशनबद्दल कळालं. त्यावेळी त्यांनी साईशाची ऑडिशन क्लिप मेकर्सना पाठवली.
4/ 6
साईशाचं ऑडिशन मेकर्सना आवडलं. आणि अशाप्रकारे छोट्या कार्तिकीच्या रूपात साईशाची निवड करण्यात आली आहे. साईशाच्या घरी आधीपासूनच ही मालिका आवडीने पहिली जात होती. या चिमुकलीलाही या मालिकेची आवड होती. त्यामुळे तिला सर्व व्यक्तिरेखा तोंडपाठ होत्या. त्यामुळे सेटवर तिला तितकसं कठीण गेलं नाही.
5/ 6
ती सेटवर पहिल्यांदा गेल्यानंतर फारच खुश झाली होती. कारण आपल्या घरात आपण जी मालिका आवडीने पाहतो. त्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने साईशा आनंदी झाली होती.
6/ 6
साईशा सुरुवातीपासूनचं सोशल मीडियावरही फेमस आहे. तिचं स्वतःच इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ज्यावर तिचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. कार्तिक आणि दीपाच्या मुलींना पाहून चाहते खूपच खुश आले आहेत.