Top 10 Marathi serials: अरुंधतीच्या आयुष्यात इमोशन ट्विस्ट; तरीही दीपा TRPमध्ये हिट
'रंग माझा वेगळा' (Rang Majha Vegla) आणि 'आई कुठे काय करते?' ( Aai Kuthe Kay karte) मालिकेत काटे की टक्कर पाहायला मिळतेय. आई कुठे काय करते मालिकेला मागे टाकत रंग माझा वेगळा या आठवड्यातही टॉप वर आहे. पाहा या आठवड्यातील कोणत्या मालिका आहेत टॉप 10मध्ये (Top 10 Marathi serials in this week)
|
1/ 10
TRP च्या रांगेत या आठवड्यात 'रंग माझा वेगळा' मालिका पहिली आली असून मालिकेला 6.8 रेटींग मिळालं आहे.
2/ 10
या आठवड्यात 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहेत.
3/ 10
फुलाला सुंगध मातीचा मालिकेने यावेळी तिसरा नंबर मिळवत 6.3 रेटिंग मिळवले आहेत.
4/ 10
तर 5.8 इतकं रेटिंग मिळवत 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.
5/ 10
नुकतीच प्रदर्शित झालेली 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेने फार कमी वेळात चांगला टप्पा गाठला आहे. मालिका या आठवड्यात 5 व्या क्रमांकावर असून मालिकेने 5.0 रेटिंग मिळवले आहेत.
6/ 10
सगळ्यांची लाडकी अप्पू यावेळी सहाव्या क्रमांकावर असून ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने 4.9 रेटिंग मिळवले आहेत.
7/ 10
'माझी तुझी रेशीमगाठ' या आठवड्यातही सातव्या क्रमांकावर असून 4.3 रेटिंग मिळाले आहे. मालिकेत लवकरच नेहा आणि यश यांचं लग्न होणार आहे.
8/ 10
या आठवड्यात 'स्वाभिमान' ही मालिका 8 व्या क्रमांकावर आहे. मागील आठवड्यातही मालिका आठव्याच क्रमांकावर होती. यावेळी मालिकेचे टीआरपी रेटिंग 3.8 इतके आहे.
9/ 10
'सह कुटुंब सह परिवार' ही मालिका दिवसेंदिवस मागे पडत असून यावेळीही मालिका नवव्या क्रमांकावर आहे. मालिकेला 3.3 इतके रेटिंग मिळाले आहे.
10/ 10
'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे तरीही मालिका या आठवड्यात सर्वात शेवटी आहे. मालिका दहाव्या क्रमांकावर असून मालिकेला 3.0 रेटिंग मिळाले आहे.