बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/ 10
अभिनेता रणदीप हुड्डा घोडेस्वारी करत असताना घोड्यावरच बेशुद्ध पडला.
3/ 10
घोडेस्वारी करताना बेशुद्ध झाल्यानं तो घोड्यावरून खाली पडला.
4/ 10
अभिनेत्याच्या पायांना प्रचंड मार लागला असून गंभीर जखमा देखील झाल्या आहेत.
5/ 10
रणदीपला तात्काळ मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालया दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे बेडरेस्ट घेण्यास सांगितलं आहे.
6/ 10
अभिनेता रणदीप हुड्डा हा सध्या आगामी सावरकर या सिनेमाची तयारी करत आहे.
7/ 10
सावरकर सिनेमात रणदीप स्वातंत्र्यवीर सावकरांची प्रमुख भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तो 22 किलो वजन कमी करत आहे.
8/ 10
वजन कमी करण्यासाठी रणदीप दररोज प्रचंड मेहनत घेत आहे. त्यासाठी घोडेस्वारी देखील करत आहे. मात्र आज घोडेस्वारी करत असताना गंभीर अपघात झाला.
9/ 10
रणदीपचा अशाप्रकारे अपघात होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी सलमान खानच्या राधे सिनेमाच्या शुटींगवेळी तो जखमी झाला होता.
10/ 10
राधे सिनेमातील अँक्शन सीनमुळे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. उजव्या पायाच्या गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं होतं.