रणबीर कपूर-आलिया भट्ट आज करणार साखरपुडा, सेलिब्रिटी पोहोचले रणथंबोरमध्ये
बॉलिवूडमधील क्यूट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) आज रणथंबोरमध्ये साखरपुडा करण्याची शक्यता आहे. या दोन्ही सेलिब्रिटींचे निकटवर्तीय रणथंबोरमध्ये दाखल झाले आहेत.


रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नाच्या चर्चा देखील विशेष रंगल्या होत्या. 2020 च्या सुरुवातीला अशी बातमी समोर आली होती की दोघे यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहेत, मात्र तसं झालं नाही. असं असलं तरी वर्षाअखेरीस आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अशा चर्चा होत आहेत की, रणबीर-आलिया आज साखरपुडा करणार आहेत. (फोटो सौजन्य-@filmydotcom/Instagram)


दीपिका-रणवीर देखील मुंबई विमानतळावर दिसले होते. नीतू कपूर यांच्याबरोबर आलिया-रणबीर देखील जयपूरला रवाना झाले आहेत. त्यानंतर नीतू कपूर यांनी देखील रणवीर-रणबीर बरोबरचा जयपूरमधील फोटो पोस्ट केला होता. (फोटो सौजन्य- @viralbhayani/instagram)


बॉलिवूड हंगामाच्या बातमीनुसार आलिया भट्टचे वडील दिग्दर्शन-निर्माता महेश भट्ट, रणबीर कपूरची बहिणी रिद्धिमा कपूर साहनीचा नवरा भारत साहनी, मुलगी समारा आणि आदर जैन देखील रणथंबोरमध्ये पोहोचणार आहेत. यावेळी करण जोहर देखील रणथंबोरमध्ये दाखल होणार आहे. (फोटो सौजन्य- @viralbhayani/instagram)


अहवालाच्या मते, हे सर्वजण रणथंबोरच्या अमन हॉटेलमध्ये थांबले आहेत. सुरुवातीला अशी माहिती समोर येत होती की हे सर्व सेलिब्रिटी न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले आहेत, मात्र आलिया-रणबीरच्या जवळच्या व्यक्ती एकत्र आल्याने आज दोघांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य- @viralbhayani/instagram)


आलिया-रणबीर गेली दोन वर्ष डेट करत आहेत. आलिया भट्टने लग्नाबाबत विचारलं असता अशी प्रतिक्रिया दिली होती की, ती सध्या लग्न नाही करू शकत कारण तिचं वय खूप कमी आहे. तर रणबीरने काही दिवसांपूर्वी अशी प्रतिक्रिया दिली होती की, जर पँडेमिक नसता तर त्याने एव्हाना लग्न केलं असतं.