बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या आईचं निधन झालं आहे. त्या गेली कित्येक दिवस कॅन्सरसोबत झुंज देत होत्या. परंतु त्यांचा हा लढा अपयशी ठरला.
2/ 8
राखी सावंतसाठी ही वेळ फारच कठीण आहे. आज अभिनेत्रीने आपल्या आईला गमावलं आहे. आईपश्चात अभिनेत्री राखी सावंतच्या कुटुंबात कोणकोण आहे? हे आज आपण जाऊन घेऊया.
3/ 8
अभिनेत्री राखी सावंतचं खरं नाव निरु भेडा आहे. राखीच्या आई जया भेडा यांनी आनंद सावंत यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. राखीचे वडील वरळी पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल होते.
4/ 8
अभिनेत्रीच्या वडिलांचा २०१२ मध्ये निधन झालं होतं. राखीच्या वडिलांचा एकही फोटो अद्याप पाहायला मिळालेला नाहीय.
5/ 8
राखी सावंतचा एक भाऊ आहे त्यांचं नाव राकेश सावंत असं आहे. ते एक सिने दिग्दर्शक आहेत.
6/ 8
राखी सावंतची एक बहीणसुद्धा आहे. जिचं नाव उषा सावंत असं आहे.
7/ 8
परंतु राखीच्या भावंडांना कधीही तिच्यासोबत पाहण्यात आलेलं नाहीय.
8/ 8
राखीने काही दिवसापूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं आहे.