गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्या लग्नाचा गोंधळ सुरु आहे.
2/ 8
राखीने फोटो शेअर करत आपलं लग्न झाल्याचा खुलासा केला होता. तर आदिल दुर्रानीने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला होता.
3/ 8
त्यामुळे या दोघांचं नेमकं काय चाललंय असा प्रश्न निर्माण झाला होता?मात्र आदिलने नुकतंच पोस्ट शेअर करत आपलं लग्न झाल्याची कबुली दिली आहे.
4/ 8
दरम्यान आता राखी सावंतने एक असा खुलासा केला आहे. जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
5/ 8
राखी सावंतने नुकतंच विरल भयानीसोबत बोलताना सांगितलं की ती आई बनणार होती. ती गर्भवती होती.
6/ 8
परंतु दुर्दैवाने तिचा गर्भपात झाल्याचं राखीने म्हटलं आहे. ही बातमी समोर येताच सर्वांना धक्का बसला आहे.
7/ 8
राखीने सांगितलं की, मी माझ्या प्रेग्नेंसीचा खुलासा 'बिग बॉस मराठी'च्या घरात केला होता. परंतु त्यावेळी सर्वांना असं वाटलं की मी नेहमीप्रमाणे मस्करी करत आहे.
8/ 8
राखी सावंतने खुलासा करत सांगितलं होतं की, सात महिन्यांपूर्वी तिने आदिलसोबत लग्न केलं आहे.