अखेर राखीनं जाहीर केलं लग्नाचं सिक्रेट; ड्रामा क्विनचा नवरा आदिल खान आहे तरी कोण?
बिग बॉसमधून बाहेर पडताच राखीला तिची आई आजारी असल्याची माहिती मिळाली. आई हॉस्पिटलमध्ये असताना इकडे राखीनं मात्र बॉयफ्रेंडबरोबर गुपचूप लग्न उरकलं आहे. कोण आहे राखीचा नवरा आदिल खान दुर्रानी जाणून घ्या.
ड्रामा क्विन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंतसध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात राखी वाईल्ड कार्ड म्हणून आली होती.
2/ 9
बिग बॉसमधून बाहेर येताच राखीनं सर्वांना झटका दिला आहे. राखीनं गपचूप लग्न केल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले. पण हे खरं आहे का याकडे सर्वांचं लक्ष होतं.
3/ 9
अखेर राखीनं स्वत: इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लग्न केल्याचं जाहीर केलं आहे. 'मला खूप आनंद झालाय. मी आणि आदिलनं लग्न केलं आहे. माझ्यावर बिनशर्त प्रेम करणाऱ्या आदिलबरोबर मी लग्न केलं आहे', असं म्हणत राखीनं लग्नाचे फोटो शेअर केलेत.
4/ 9
राखी आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी यांनी कोर्ट मॅरेज केलं. पण हे लग्न आज नाही तर 2 जुलै 2022मध्येच केलं होतं. राखीच्या कोर्ट मॅरेज सर्टिफिकेटवर लग्नाची तारीख पाहायला मिळतेय.
5/ 9
ड्रामा क्लिनशी लग्न करणारा आदिल नक्की आहे कोण? हे तपासल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, आदिल हा बिझनेसमॅन आहे.
6/ 9
कर्नाटकच्या मैसूर येथे यूज्ड कार्सचा तो मॅनेजिंग डायरेक्टर आहे.
7/ 9
आदिलनं बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बॅचर्लस डिग्री घेतली आहे.
8/ 9
2007मध्ये त्यानं आयस्क्रिन पार्लर आणि कारचा बिझनेस सुरू केला होता.
9/ 9
त्याचप्रमाणे आदिल स्टेट लेव्हलवर अनेक शुटींग स्पर्धांमध्ये सहभागी होत असतो.