'बिग बॉस मराठी 4' ची हवा सोशल मीडियावर पहायला मिळते. रोज काही ना काही नवीन ट्विस्ट बिग बॉसच्या घरात पहायला मिळतात. अशातच आज बिग बॉसच्या घरात 'शाई फेक' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. शाई फेक या नॉमिनेशन कार्यात राखी आणि आरोहमध्ये चांगलाच राडा झाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. आरोह म्हणतो, राखी प्रत्येक वेळी कुरघोड्या करते. गळ्यात लिंबू मिर्ची अडकवून चर्चेत राहण्यासाठी काहीही करते. यावर राखी म्हणते मी आरोहसारखी पूर्ण दिवस झोपून राहत नाही. राखी आरोहच्या वादादरम्यान आरोह राखीला म्हणतो, 'तुझ्या बापाचं काय जातंय'. राखी यावर म्हणते , 'माझ्या बापावर जाऊ नकोस'. आरोहने केलेल्या बापाच्या वाक्यावरुन आज घरात राखी आरोहमध्ये चांगलाच राडा पहायला मिळणार आहे.