'राजा राणीची ग जोडी' या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रुती अत्रे होय.या अभिनेत्रीने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
|
1/ 8
'राजा राणीची ग जोडी' या मालिकेतून खलनायिकेच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रुती अत्रे होय.या अभिनेत्रीने मोठी लोकप्रियता मिळवली आहे.
2/ 8
‘राजा राणीची ग जोडी’ या मालिकेत मुख्य पात्र संजीवनी आणि रणजीत सोबतचं एक पात्र खूप भाव खाऊन जातं ते पात्र म्हणजे ‘राजश्री ढाले पाटील’म्हणजेच वाहिनीसाहेब. तापट, मोठी सून असल्याचा माज, आणि संजीवनीला सतत कमीपणा दाखवणारं असं हे पात्र आहे.
3/ 8
खलनायिका असून देखील ‘राजश्री’ हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. रणजीत आणि संजीवनी सारखेच राजश्रीचे देखील असंख्य चाहते आहेत.
4/ 8
अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिने आपल्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त शेअर केली आहे.
5/ 8
अभिनेत्रीने आपल्या लग्नातील काही सुंदर फोटो शेअर करत आपल्या पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
6/ 8
श्रुतीने पोस्ट लिहीत म्हटलंय, ''हॅप्पी ऍनिव्हर्सरी माय लव्ह... मला विश्वास बसत नाहीय की आपल्या लग्नाला आता 3 वर्षे झाली आहेत. लव्ह यु अँड मिस यु'
7/ 8
श्रुती अत्रेला शालेय वयापासूनचं अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळे ती विविध शालेय आणि महाविद्यालयीन नाटकांमध्ये भाग घेत असे. त्यातून ती व्यावसायिक नाटक करू लागली. आणि अशा पद्धतीने ती मालिकांकडे वळली.
8/ 8
राजश्री या भूमिकेने श्रुतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. श्रुती सध्या ही भूमिका खुपचं एन्जॉय करत आहे.