

राधिका आपटे आणि स्लमडॉग मिलेनिअर अभिनेता देव पटेल यांचा एक इंटिमेट सीन सध्या सोशल मीडियावर लीक झाला आहे. या फोटोंमध्ये दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत. व्हायरल झालेला सीन हा त्यांच्या आगामी वेडिंग गेस्ट सिनेमातील आहे की नाही हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही.


राधिकासोबत हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. याआधीही राधिकाच्या पार्श्च सिनेमातील तिचे बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक झाले होते. देव पटेल आणि राधिका यांच्या आगामी वेडिंग गेस्ट सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर हा एक ब्रिटीश अमेरिकन सिनेमा आहे.


1 मार्चला हा सिनेमा अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. अक्शन थ्रिलर असा हा सिनेमा गेल्या वर्षी 8 सप्टेंबरला टोरँटो फिल्म प्रिमिअरमध्ये दाखवण्यात आला होता.


सिनेमाची कथा ही एका ब्रिटीश मुस्लीम व्यक्तिभोवती फिरते. देव पटेलने या सिनेमात त्या ब्रिटीस मुस्लीम व्यक्तिची भूमिका साकारली आहे.