

अभिनेत्री प्रियांका चोप्रानं 18 जुलैला तिचा 37 वा वाढदिवस मायामीमध्ये साजरा केला. यावेळी तिच्या ड्रेस पासून ते केक पर्यंत सर्वच गोष्टींची चर्चा झाली. मात्र या व्हेकेशनचा व्हायरल झालेला प्रत्येक फोटो प्रियांकसाठी डोकेदुखी ठरला.


प्रियांकानं नुकताच 18 जुलैला तिचा 37 वाढदिवस साजरा केला. लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस असल्यांनं पती निकनं सेलिब्रेशनमध्ये कसलीच कसर सोडली नव्हती. या ठिकणी तिची बहीण आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा सुद्धा दिसली.


प्रियांकानं मायामीमध्ये वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन केलं. पण वाढदिवसाच्या पार्टीनंतर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.


प्रियांका नुकतीच मायामी बीचवर पिंक कलरच्या हाय वेस्ट बिकीनीमध्ये दिसली. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. याआधीही प्रियांकाचे बिकीनी लुक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.


यावेळी प्रियांका जेटस्की राइड करताना स्पॉट झाली. तिचा हा लुक कोणत्याही अॅक्शन सिनेमापेक्षा कमी नव्हता.


नुकतेच प्रियांकाचे आई मधू चोप्रा आणि निक जोनससोबत सिगारेट ओढतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यावरून तिला नेटकऱ्यानी बरंच ट्रोल केलं.


प्रियांकाचा बिकिनी लुक व्हायरल झाला आणि यावरुनही प्रियांकाला ट्रोल करण्यात आलं. पिंक कलरच्या बिकिनीवर प्रियांकानं त्याच कलरचे ग्लव्ह्स घातले होते. याला 50 दशकातील फॅशन म्हणत नेटकऱ्यांनी तिला टार्गेट केलं.