cannes film ला भारतीय अभिनेत्रींनी ही अनेकदा हजेरी लावली होती. त्यांच्या लुकचीही विशेष चर्चा रंगली होती. पाहा त्यांचे हटके लुक्स. 2019ला Cannes Film Festival मध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोनने हा पोपटी रंगाचा गाऊन परिधान केला होता. प्रियंका चोप्रा Cannes 2019 मध्ये पती निक जोनास सोबत दिसली होती. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने २००२ मध्ये कान्समध्ये डेब्यू केला होता. २०१९ साली ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत कान्समध्ये पोहोचली होती. सोनम कपूरनेही हटके ड्रेस परिधान करत कान्सला हजेरी लावली होती. पांढऱ्या लेंहग्यामध्ये सोनम फारच सुंदर दिसत होती. २०१५मध्ये अभिनेत्री कतरीना कैफने कान्सला हजेरी लावली होती. अभिनेत्री कंगना राणौतनेही सोहळ्याला हजेरी लावली होती. 2018 मध्ये साडी परिधान करत कंगना राणौत कान्ससाठी पोहोचली होती.