'मी सुद्धा लैंगिक अत्याचाराचा सामना केला, लहान असताना...', प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा
एका मुलाखतीत प्रियांकानं तिच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला आहे.
|
1/ 8
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते मात्र आता ती चर्चेत आली आहे ते तिनं नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीमुळे. या मुलाखतीत तिनं तिच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा केला आहे.
2/ 8
यावेळी लैंगिक अत्याचाराबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली की, ‘असं वाटतं की शोषण हा शब्द महिलांनाच जोडून आला आहे. आता महिलाच महिलांना मदत करायला पुढे आल्यामुळे ते आपल्याला गप्प करू शकत नाहीत आणि हे पाहून हिंम्मत अजून वाढते.’
3/ 8
प्रियांका पुढे म्हणाली की, ‘माझ्यामते, इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला हा अनुभव आला असेल. प्रत्येकवेळी आवाज उठवला जायचा पण ऐकणारं कोणी नव्हतं. पण आता मला काही सांगायचे असेल तर मला नाही वाटत कोणी ऐकणार नाही. तसंच मला ती गोष्ट सांगायला लाजही वाटणार नाही.’
4/ 8
भारतात #MeToo ची सुरुवात बॉलिवूड अभिनेत्रींनी केली होती. तनुश्री दत्ताने प्रसारमाध्यमांसमोर आपला अनुभव शेअर करताना नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.
5/ 8
नाना यांच्याशिवाय आलोक नाथ, साजिद खान, विकास बहल, अनु मलिक, कैलाश खेर यांच्यावरही बॉलिवूड सेलिब्रिटींनी शोषणाचे आरोप केले आहेत. त्यावेळीही प्रियांकाने आपला आवाज उठवला होता.
6/ 8
प्रियांका म्हणाली होती की, ‘जर लोकांनी ही चळवळ बॉलिवूडपर्यंत मर्यादित ठेवली तर लोकांना ही चळवळ समजलीच नाही असं मी म्हणेन.’
7/ 8
‘हे फक्त सिनेसृष्टीतच होतं असं नाही तर इतर क्षेत्रातही या घटना होत असतात. जे माझ्यासोबत झालं ते फार आधी झालं. मी लहान असताना माझ्यासोबत ही घटना घडली.’
8/ 8
‘मी याबद्दल बोलत का नाही असा प्रश्न लोक मला विचारत असतात. माझ्याकडून अनेकांना फार अपेक्षा आहेत. माझ्या देशातील सगळ्याच महिलांनी याचा अनुभव घेतला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी याबद्दल बोलण्याचं त्या आजही टाळतात.’