

बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास करत ग्लोबल स्टार बनलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. पण नुकतंच तिनं असं काही केलंय ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


निक आणि प्रियांकाची जोडी तर सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय बनतात. कधी त्यांच्याबद्दल उलट सुलट लिहिलं जातं तर कधी अफवा. मात्र या दोघांमधील स्पेशल बॉन्डिंग सगळीकडे दिसून येतं.


कोणताही इव्हेंट असो वा कॉन्सर्ट प्रियांका नेहमीच निकसोबत दिसते. मात्र नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनला प्रियांका काही कारणानं निकसोबत उपस्थित राहू शकली नाही.


निक त्याचे दोन्ही भाऊ, जो आणि केविन यांच्यासोबत उपस्थित होता. यावेळी जोनस ब्रदर्सच्या ‘सकर’ या गाण्याला अवॉर्ड मिळाला. त्याच्या आनंदात जो आणि केविन यांच्या पत्नींना त्यांना किस केलं.


यावेळी निक मात्र एकटाच हसत उभा होता. हे प्रियांकाला सहन झालं नाही आणि तिनं हा फोटो तिच्या जुन्या फोटोसोबत मॉर्फ करत तिच्या सोशल मीडियावर शेअर केला.


या फोटोला तिनं खूपच रोमँटिक कॅप्शन दिलं. तिनं लिहिलं, ‘मी नेहमीच तुझ्या सोबत आहे निक. अभिनंदन जोनस ब्रदर्स’ हो फोटोशॉप्ड केलेला फोटो प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.