बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावत आहे. यामध्ये तिला मोठ्या प्रमाणात यशदेखील मिळालं आहे. प्रियांका सतत आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ मुळे चर्चेत असते.
2/ 8
सध्या असंच काही घडलं आहे, ज्यामुळे प्रियांका प्रचंड चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या नावाच्या समोरून पती निक जोनसच सरनेम काढून टाकलं होतं.
3/ 8
त्यामुळे अभिनेत्रीच्या वैवाहिक जीवनात काहीतरी बिनसलं असल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर प्रियांका आपल्या पतीसोबत घटस्फोट घेणार असल्याच्यादेखील अफवा पसरल्या होत्या.
4/ 8
या सर्व चर्चा सुरु असतानाच आणखी एक बातमी पसरली आहे. ती म्हणजे प्रियांका चोप्रा आई होणार असल्याची.
5/ 8
खरं सांगायचं तर, नुकताच नेटफ्लिक्सवर 'जोनस ब्रदर्स फॅमिली रोस्ट' ही सिरीज रिलीज झाली आहे. यामध्ये त्यांच्या लेडी पार्टनर्सनी त्यांना कंपनीदिली होती.
6/ 8
यावेळी प्रियांका निकवर अनेक जोक केले. यातच प्रियांकाने म्हटलं निकचे मोठे भाऊ केविन आणि जो जोनस यांना मुले आहेत.
7/ 8
आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही एकमेव असं कपल आहे, ज्यांना मुले नाहीत. त्यामुळे मी आणि निक एक्स्पेक्ट करत आहोत. असं म्हणत प्रियांकाने एक मोठा पॉज घेतला.
8/ 8
त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. सर्वांनाचा जणू श्वासच थांबला होता. त्यांनतर प्रियांकाने आपलं वाक्य पूर्ण करत म्हटलं, ड्रंक करून रात्री झोपी जायचं. अभिनेत्रीचं हे वाक्य ऐकून सर्वांनाच हश्या पिकला. प्रियांकाचा हा खास अंदाज सर्वानाच आवडला.