बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने नुकतंच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान हा दिवस तिच्या लेकीसाठीसुद्धा खास होता. नुकतंच प्रियांका आणि निकची लेक मालती 6 महिन्यांची झाली. आपल्या वाढदिवसासोबत अभिनेत्रीने हा दिवसससुद्धा साजरा केला. अभिनेत्रीने आता आपल्या धम्माल सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी प्रियांका निक आपल्या मुलीला घेऊन उभे असलेले दिसून येत आहेत. प्रियांकाची लेक मालतीने यामध्ये क्युट असा पिंक कलरचा फ्रॉक घातलेला दिसून येत आहे. सोबतच निक जोनस हातात एक छोटासा सुंदर केक घेऊन उभा आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रशनचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. या शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री परिणिती चोप्रासुद्धा आहे.