

'देसी गर्ल' अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडली आहे. त्यानंतर आताही तिच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.


2018 च्या डिसेंबर मध्ये प्रियांकानं अमेरिकन गायक निक जोनसशी जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईमध्ये त्यांनी रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.


प्रियांका बराच काळ बॉलिवूडपासून दूर असून सध्या ती आपल्या संसारात रमली आहे. मात्र 'द स्काय इज पिंक' पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.


प्रियांका 'द स्काय इज पिंक'चं शूटिंग पूर्ण करून नुकतीच आपल्या सासरी परतली. या सिनेमा pulmonary fibrosis पीडित आयशा चौधरी हिच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात प्रियांकासोबतच जायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.


'मिस वर्ल्ड 2000' ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियांकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. प्रियांकाच्या नावाचा समावेश आता यूएसए टुडेच्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत झाला आहे.


प्रियांका आता मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत तिच्यासोबत ओपरा विनफ्रे, बियांसे, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचाही समावेश आहे.