अभिनेत्री रिताशा राठोडने छोट्या पडद्यावरील मालिका 'बडो बहू'मध्ये एका धष्टपुष्ट मुलीची भूमिका साकारली होती. या शोमध्ये प्रिन्स नरुलासोबत रिताशाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.
|
1/ 8
अभिनेत्री रिताशा राठोडने छोट्या पडद्यावरील मालिका 'बडो बहू'मध्ये एका धष्टपुष्ट मुलीची भूमिका साकारली होती. या शोमध्ये प्रिन्स नरुलासोबत रिताशाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते.
2/ 8
रिताशा तिच्या ओव्हरवेटमुळे जितकी चर्चेत होती, तितकीच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त आता ती तिच्या बोल्डनेस आणि ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे.
3/ 8
रियताशा राठोडने छोट्या पडद्यावर 'बडो बहू'ची भूमिका साकारली तेव्हा तिने आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या मालिकेच्या कथेच्या मागणीमुळे रिताशाने तिचे वजन वाढवले होते. आता तिची फिटनेस जर्नी पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.
4/ 8
अभिनेत्री रिताशा राठोडने या शोमध्ये कोमल अहलावत नावाच्या सुनेची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला प्रचंड वजन वाढवावं लागलं होतं. रिताशाने एकदा सांगितलं होतं की, तिचं वजन 100 किलो झालं आहे.
5/ 8
ज्यांनी अभिनेत्री रिताशा राठोडला 'बडो बहू' म्हणून पाहिले असेल त्यांना अभिनेत्रींचे आत्ताचे फोटो पाहून नक्कीच आश्चर्य वाटणार आहे.
6/ 8
रिताशाने अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. आणि तिचे फिटनेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून लोकांना विश्वास ठेवणं कठीण झालं आहे
7/ 8
रिताशा रिअल लाईफमध्ये फारच बोल्ड अँड बिनधास्त आहे.
8/ 8
एकदा रिताशा राठोड म्हणाली होती की, 'मी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी नव्हे तर लोकांना त्यांच्या शरीराबद्दल जागरूक करण्यासाठी फोटो सेशन करते'.