महाराष्ट्राची लाडकी गायिका आणि अभिनेत्री म्हणून आर्या आंबेकरची ओळख आहे. यासोबतच आपल्या सौंदर्यानेही तिने चाहत्यांवर जणू मोहीनीच टाकली आहे. पाहा आर्याचे मनमोहक फोटो.
2/ 14
आर्या सध्या झी मराठी वरील 'सा रे ग म प लिटील चॅम्प्स' या कार्यक्रमात जजची भूमिका साकरत आहे.
3/ 14
आपल्या गोड आवाजाने आर्याने अगदीच बालपणीच श्रोत्यांच्या मनात घर केलं होतं.
4/ 14
तब्बल १३ वर्षांपूर्वी आर्याही सा रे ग म प लिटील चॅम्प्सच्या पहिल्या पर्वात झळकली होती. टॉप पाच स्पर्धकांमध्ये आर्याने बाजी मारली होती. हे नवं सांगायला नको. तर आता याच कार्यक्रमात ती बालगायकांना मार्गदर्शन करताना दिसत आहे.
5/ 14
बालपणीच सा रो ग म पच्या मंचावर आर्याची 'प्रिटी यंग गर्ल' अशी ओळख बनली होती.
6/ 14
पण आर्याने तिच्या गोड गळ्यासोबतच सौंदर्यानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
7/ 14
आर्याने तिच्या चाहत्यांचे तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आभार मानले आहेत. ती लिहिते, 'तुम्ही सगळयांनी गेले 2 दिवस माझ्यावर आणि सारेगमप लिटिल चॅम्पस् ह्या कार्यक्रमावर जो प्रेमाचा वर्षाव केलायत त्यानी मी इतकी भारावून गेलेय की शब्दात वर्णन करता येत नाहीये'
8/ 14
पुढे ती लिहिते की, 'मला tag केलेल्या stories, posts, comments, memes मी बघितल्या/वाचल्या आहेत..आणि जमेल तितक्या stories reshare सुध्दा केल्या आहेत..असंच तुमचं प्रेम आणि rock solid support माझ्या पाठीशी कायम असुदेत, हीच विनंती...'
9/ 14
आर्याने 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं होतं.
10/ 14
त्यातील तिची तन्वीची व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली होती. अभिनय बेर्डे सोबत तन्वीची केमिस्ट्री हिट ठरली होती.
11/ 14
या चित्रपटातील काही गाणी देखील आर्याने गायली होती. जी सुपरहिट ठरली होती.
12/ 14
सध्या सोशल मीडियावर आर्याला नवी क्रश म्हटलं जात आहे.
13/ 14
सोशल मीडियावर आर्या तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
14/ 14
सा रे ग म पमध्ये आर्या इतरही पाच तिच्या सहगायकासोंबत दिसते. त्यांना पंचरत्न म्हटलं जातं.