Home » photogallery » entertainment » PRAVAH PICTURE NEW MARATHI MOVIE CHANNEL BHARAT JADHAV ANKUSH CHAUDHARI KEDAR SHINDE SEEN PAINTING WALLS IN MUMBAI NEWS MHRN
दादरसारख्या गजबजलेल्या एरियात भिंतीजवळ काय करत आहेत भरत अंकुश केदार?
Pravah Picture new Marathi movie channel: भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे हे त्रिकुट मराठी चित्रपटसृष्टीत लोकप्रिय आहे. दादर परिसरातील तुलसी पाईप रोडच्या भागात हे त्रिकुट नुकतंच दिसून आलं. ते नक्की काय करत होते पहा फोटोज्
|
1/ 8
दर्जेदार मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आलेल्या ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवला. या अनोख्या उपक्रमा अंतर्गत मुंबईतील तुलसी पाईप मार्गाजवळ मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सिनेमांचं भव्यदिव्य भिंतीचित्र साकारण्यात आलं.
2/ 8
सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी आणि प्रतिभावंत दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खास उपस्थितीत ह्या भव्यदिव्य भिंतीचित्रांचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी ही अनोखी भिंतीचित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
3/ 8
मराठी कलाकारांची हुबेहुब चित्र साकारत या चित्रकारांनी तुलसी पाईप मार्गाचं रुप पालटलं आहे. ही बोलकी भिंतीचित्र सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत.
4/ 8
अंकुश चौधरीने साकारलेल्या भूमिकांचं हुबेहूब चित्र या भिंतींवर पाहायला मिळालं
5/ 8
या निमित्ताने भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे हे त्रिकुट बऱ्याच दिवसांनी एकत्र आलं.
6/ 8
या कलाकारांनी आपली सही खास या भिंतींवर काढत या चित्रांचं कौतुक केलं.
7/ 8
प्रवाह पिक्चरवरून दर आठवड्याला नव्या कलाकृती बघायला मिळणार आहेत.
8/ 8
चंद्रमुखी, पावनखिंड असे नुकतेच आलेले चित्रपट प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहेत