अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून नेहा कामत या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. परीची आई साकारणारी प्रार्थना सध्या स्वतः सुद्धा एका परीसारखी दिसत आहे. प्रार्थनाच्या नव्या फोटोशूटची सध्या जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. यात तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली असून यात प्राची रील लाईफमधली आईच एका परीप्रमाणे दिसते असं अनेकांचं म्हणणं आहे. एका फ्लोरल निळ्या साडीसोबत स्टेटमेंट ज्वेलरी परिधान करून उत्तम मेकअपसह ती एकदम सुंदर दिसली आहे. तिचा हा ब्लु साडी लुक सुद्धा बराच पसंत केला जातो आहे. यावर एका चाहत्याने चक्क कमेंट करत तिला असं म्हणलं की, “माझ्या डोळ्यांना नक्कीच काहीतरी झालय ज्याने मी नजर तुझ्यावरून हटवू शकत नाहीये.” प्रार्थनाने या फोटोशूटचे काही bts moments सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. प्रार्थनाचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. प्रार्थना सध्या तिच्या मालिकेमुळे वेगेवेगळ्या साडीचे लुक परिधान करताना दिसते.