अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अक्षय्य तृतीयेनिमित्त प्रार्थनानं नुकतचं एक फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमुळे प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. मोरपंखी रंगाच्या पैठणीत प्रार्थनानं पारंपारिक दागिने घालून खास फोटोशूट केलं आहे. प्रार्थनाचा हा पारंपारिक लुक पाहून चाहते मात्र घायाळ झाले आहेत. प्रार्थनाने तिचे हे फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. प्रार्थनाची प्रत्येक पोझ चाहत्यांचे लक्षवेधून घेत आहे. साधा पण तितकाच सुंदर लुक कुणीही फेस्टीव्हलसाठी ट्राय करू शकते. असाच काहीसा प्रार्थनाचा लुक आहे. प्रार्थना सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा कामतची भूमिका साकरताना दिसत आहे. नेहा कामचवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. नेहाचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. प्रार्थनानं मराठीसह हिंदी मालिका विश्वात देखील अभिनयाचा ठसा उमठविला आहे. मराठी सिनेमांमध्ये अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली आहे. प्रार्थना कधी पारंपारिक तर कधी वेस्टर्न कपड्यात फोटोशूट करत असते. प्रार्थना तिच्या हसण्याच्या पद्धतीमुळे देखील नेहमी चर्चेत असते. प्रार्थनाचा हा पैठणी लुक मात्र चाहत्यांना फलताच आवडलेला आहे. ( फोटो साभार- प्रार्थना बेहेरे इन्स्टा)