मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सध्या तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं प्रार्थनानं तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती काहीशा हटके लुकमध्ये दिसत आहे. महिला दिनाच्या निमित्तानं प्रार्थनानं तिचे साडीतील काही फोटो शेअर केले. मात्र या फोटोमध्ये नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे. प्रार्थनानं साडी नेसताना त्यात काही बदल केले आहेत ज्यामुळे तिचे हे फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंमध्ये प्रार्थनानं आधी जीन्स घालून मग त्यावर साडी नेसली आहे आणि यावर तिनं डेनिम जॅकेट घातलं आहे. प्रार्थनानं हे फोटो शेअर करताना लिहिलं, ‘आज थोड़ा लिबास में बदलाव लाया, कल थोड़ा समाज में होगा, पहचान तो है ही मेरी, बस अब रवायत ए आगाज़ होगा’ स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या ‘मितवा’ सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या प्रार्थनानं आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रार्थना बेहरेचा ‘अजिंक्य’ हा सिनेमा येत्या 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तिच्यासोब भूषण प्रधान मुख्य भूमिकेत आहे.