Prajakta Mali : 'तो म्हणाला म्हणून गेले अन्...'; प्राजक्ता माळी सांगतेय पहिल्या सिनेमामागचा 'तो' प्रसंग
प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकताच प्राजक्तराज हा दागिन्यांचा ब्रँड लाँच केलाय. त्यातील एका दागिन्याच्या कॅटेगिरीला तिनं सोनसळा असं नाव दिलंय. हे नाव तिच्या पहिल्या सिनेमातील व्यक्तिरेखचं होतं असं तिनं सांगितलंय. पण तुम्हाला माहिती आहे का प्राजक्ताला कसा मिळाला होता तिचा पहिला सिनेमा?
जुळून येती रेशीमगाठी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी.
2/ 15
प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
3/ 15
नुकताच प्राजक्तानं तिचा प्राजक्तराज हा नवा ज्वेलरी ब्रँड लाँच केला.
4/ 15
तुळजा, म्हाळसा आणि सोनसळा म्हणजेच सोन चांदी आणि इमिटेशन अशा तिनं कॅटेगिरीमध्ये प्राजक्तानं दागिने तयार केलेत.
5/ 15
प्राजक्तराजमधील एका कॅटेगिरीचं नावं हे तिच्या पहिल्या सिनेमातील भूमिकेत आहे. ते म्हणजे सोनसळा.
6/ 15
पण प्राजक्ताला तिचा पहिला सिनेमा कसा मिळाला होता हे माहितीये का? यामागे एक गंमतीशीर गोष्ट आहे.
7/ 15
प्राजक्तानं अभिनयातून शिक्षण घेतलेलं नाही. ललित कला केंद्रातून नृत्यातून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. त्यामुळे तिथे अभिनय आणि संगीत शिकवला जातो.
8/ 15
डान्स करत असताना डान्स ग्रुपमधील एक मुलगा एका सिनेमासाठी काम करत होता. त्यांना अभिनेत्री आसावरी जोशी यांचा तरुणपणीचा चेहरा हवा होता.
9/ 15
प्राजक्ता म्हणाली, 'एके दिवशी तो मुलगा रस्त्यात भेटला आणि मला पाहून थांबला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला तू सेम आसावरी जोशींसारखी दिसते'.
10/ 15
'त्याने मला थांबवलं आणि म्हणाला, तू जा तिथे ऑडिशन देऊन ये. फक्त तोंड दाखवून ये'.
11/ 15
'त्या दिवशी आम्ही दुसरीकडेच निघालो होतो आणि तो भेटला आणि आम्ही तिसरीकडेच गेलो. असंच तोंड दाखवायचं म्हणून मी गेले'.
12/ 15
'तांदळा सिनेमासाठी मी गेले. मी गेले त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले, पुढच्या आठवड्यात वेळ आहे तुला? कॉलेज आहे पण मी बंक करेन', असं मी त्यांना म्हटलं.
13/ 15
'त्यानंतर त्यांनी लगेच मला फायनल केलं. माझी ऑडिशनही घेतली नाही. त्यांनी मला नावही नाही विचारलं'.
14/ 15
'मला त्या सिनेमात अभिनय करायचा नव्हता. फ्लॅशबॅक दाखवायचा होता. तिचं लग्न दाखवायचं होतं'.
15/ 15
तांदळाच्या सेटवर एका असिस्टंट डिरेक्टरला माझा आवाज आवडला. ज्यांनी मला गुड मॉर्निंग महाराष्ट्रच्या ऑडिशनसाठी गेले.