मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चाहत्यांमध्ये प्राजक्ताची चांगलीच क्रेझ पहायला मिळते. तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते. प्राजक्ताने नुकतंच एक फोटोशूट केलं असून तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत प्राजक्ताने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. फोटो शेअर करत प्राजक्ता म्हणाली, 'गिरे तो भी टांग उपर पोझ...नाही नाही गंमत करतेय. मार्केटमध्ये अशा पोझ चालू आहेत म्हणून दिली'. तिचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. खास करुन तिनं दिलेलं कॅप्शन. फोटोंवर भरभरुन कमेंट आणि लाईक्सचाही वर्षाव पहायला मिळतोय.