प्राजक्ता माळी (Prajakta Mali) मराठी मनोरंजनसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गेली दोन दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. दरम्यान अभिनयासोबतच प्राजक्तानं आता आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. (Prajakta mali movie) तिने स्वत:चा काव्यसंग्रह प्रकाशित केला. या प्रकाशनसोहळ्याच्या वेळी तिने आपल्य आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा सांगितला. (Prajakta Mali video viral) लिखाणाच्या आवडीमुळे तिला आईचा झाडूने मार खावा लागला होता. प्राजक्ताच्या या काव्यसंग्रहाचं नाव ‘प्राजक्तप्रभा’ असं आहे. मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा प्रकाशनसोहळा पार पडला. यावेळी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल सांगताना तिने एक चकित करणारा किस्सा सांगितला. प्राजक्तानं 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिनं सावित्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर ती ‘जुळून येती रेशिम गाठी’, ‘नकटिच्या लग्नाला यायचं हं’ या मालिकांमध्ये काम केलं. ‘जुळून येती रेशिम गाठी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या ‘मेघा देसाई’ या व्यक्तिरेखेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.