मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

'श्रीरामा'च्या व्यक्तिरेखेसाठी प्रभासने घेतले 150 कोटी, आतापर्यंतच्या 5 अभिनेत्यांपैकी 'बाहुबली' सर्वांत महागडा

भगवान राम (Lord Ram) ही देशभरातील अनेक संस्कृतींमधले सर्वात महत्त्वाची व्यक्तीरेखा आहे. श्रीरामाचं पडद्यावर चित्रण करण्यासाठी अनेक चित्रपट बनवले गेले आहेत आणि भविष्यात आणखी बरेच चित्रपट बनवले जातील. सध्या ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेता प्रभास चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून खूप आशा आहेत. कारण याआधी बाहुबली फेम अभिनेता साहो किंवा राधेश्याममधून काही विशेष कमाल दाखवू शकला नाहीये. श्रीरामाच्या माध्यमातून प्रभास पहिल्यांदाच ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मात्र, आम्ही तुम्हाला त्या तेलुगू स्टार्सबद्दल सांगत आहोत, ज्यांनी प्रभासच्या आधी भगवान रामाच्या भूमिका चित्रपटात केली आहे. आपण टॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कलाकार पाहूया ज्यांनी पडद्यावर भगवान रामाची भूमिका साकारली आहे.