अभिनेत्री पूजा सावंतनं तिच्या नृत्यामुळे आणि अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
2/ 13
पूजा सावंत ही श्रावण क्विन सौंदर्य स्पर्धेची विजेती ठरली त्यानंतर ती सिनेक्षत्रात सक्रीय झाली. पण सौंदर्य स्पर्धा जिंकण्याआधीच पूजाला पहिला सिनेमा ऑफर झाला होता.
3/ 13
पहिला सिनेमा कसा मिळाला याविषयी पूजानं एका मुलाखतीत सांगितलं आहे. ती म्हणाली, मला त्या स्पर्धेला जायचं नव्हतं. त्या दिवशी आईशी माझं खूप भांडण झालं होतं. आईनं मला टॅक्सीमध्ये बसवून नेलं होतं.
4/ 13
'मी इतकी भांडले होते की, माझं ठरलं होतं सिग्नलला टॅक्सी थांबल्यानंतर उतरून निघून जायचं होतं'.
5/ 13
'मी आईला सांगितलं होतं की हे बघ मला असं काही करायचं नाहीये'.
6/ 13
पूजा पुढे म्हणाली, 'मी दिसायला फार ऑडिनरी होते. आयब्रोज करणं, हेअर कट करणं हे माझ्यासाठी फार दुरची गोष्ट होती'.
7/ 13
'त्या दिवशी आईने मला पार्लरमध्ये नेऊन ते सगळं करून घेतलं होतं म्हणून मी तिच्यावर खूप चिडले होते'.
8/ 13
'ऑडिशनला गेले. माझा राऊंड आला. त्यांनी मला विचारलं तू काय सादर करणार मी म्हटलं डान्स. डान्स करायला लागले आणि लाईट्स गेले'.
9/ 13
'तेव्हा सचित पाटील तिथे परीक्षक होते त्यांनी मला विचारलं की तू आता डान्स करू शकतेस. मी हो म्हणाले आणि गाणं न वाजवता मी डान्स केला'.
10/ 13
'माझा तो डान्स त्यांना भयंकर आवडला आणि त्यांनी मला क्षणभर विश्रांती सिनेमासाठी कास्ट केलं'.
11/ 13
'त्या दिवशी मी ती स्पर्धा जिंकले नव्हते तो ऑडिशन राऊंड होता आणि त्याच दिवशी सचित पाटीलनं मला क्षणभर विश्रांतीसाठी विचारलं'.
12/ 13
पूजाच्या घरी अनेक मांजरी आहेत. पाळीव प्राणी, भटक्या जनावरांनीसाठी पूजा काम करते.
13/ 13
भविष्यात तिला प्राण्यांसाठी स्वत:चं शेल्टक तयार करायचं आहे.