

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक कार्यक्रमात देशातीलच नाही तर परदेशातील ही अनेक बडे नेत्यांनी उपस्थिती लावली होती.


यात बॉलिवूड कलाकारांच्या नावाचाही समावेश होता. राष्ट्रपती भवनात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.


राजकुमार हिरानी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत आनंद एल राय, दिव्या खोसला कुमार, आनंद एल राय आणि करण जोहरही दिसले.


भाजप मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबतही बॉलिवूड कलाकारांनी फोटो काढले. यावेळी फोटोमध्ये कपिल शर्मा, शाहिद कपूर- मीरा राजपूत, दिग्दर्शक अभिषेक कपूर, राकेश ओम प्रकाश मेहराही दिसत होते.


पीएम नरेंद्र मोदी यांची समर्थक कंगना रणौतनेही या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी तिने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती.