

लोकसभा निवडणूक 2019 च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे प्रचाराला सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे निवडणुकीबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.


लोकसभेच्या ज्या जागांवर उमेदवारांची घोषणा झालेली नाही विशेषतः त्या जागांवर कोण निवडणूक लढवणार याचे अंदाज बांधले जात आहे.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्यांच्या नावांचा अंदाजही लावला जात आहे. अभिनेता अक्षय कुमार भाजप कडून निवडणूक लढवणार असं म्हटलं जात आहे.


अशातच बायोपिकचा ट्रेंड सुरु असलेल्या बॉलिवूडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधान मोदींवर येत असलेल्या सिनेमाबाबत एक नवी घोषणा करण्यात आली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित बायोपिक 'पीएम मोदी'च्या प्रदर्शनाची चर्चा मागच्या काही काळापासून होती. मात्र आता ही चर्चा थांबली असून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे.


अभिनेता विवेक ओबेरॉयची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा लोकसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजेच येत्या 12 एप्रिलला प्रदर्शित केला जाणार आहे.