लग्नाची वाइफ वेडिंगची बायको मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. अभिनेता विजय आंदळकर आणि आणि रुपाली झंकार यांच्या मुलीच्या बारशाचे फोटो आले समोर .
पिंकिंचा विजय असो मालिकेतील अभिनेता विजय आंदळकर नुकताच बाबा झाला आहे.
2/ 8
विजय आणि अभिनेत्री रुपाली झंकार यांनी 21 एप्रिल 2021 मध्ये लग्न केलं. लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेच्या सेटवर दोघांचे सुर जुळले.
3/ 8
विजय आणि रुपाली यांना जानेवारी 2023मध्ये कन्यारत्न प्राप्त झालं आहे. दोघे सध्या पॅरेंटहुड एन्जॉय करत आहेत.
4/ 8
‘बाप झालो, लक्ष्मी घरी आली रे!’ असं म्हणत अभिनेता विजयनं ही खुशखबर चाहत्यांना दिली होती.
5/ 8
अभिनेत्याची लेक आता दोन महिन्यांची झाली आहे. नुकतंच तिचं बारसं करत दोघांनी लेकीचं छान नाव देखील ठेवलं आहे.
6/ 8
रुपाली आणि विजयच्या लेकीचा बारसा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. दोघांनी फोटो शेअर करत लेकीचं नाव सांगितलं आहे.
7/ 8
दोघांनी लेकीचं नाव मायरा असं ठेवलं आहे. मायरा हे नाव सध्या मुलींच्या नावांच्या यादीत ट्रेडिंग आहे. मायरा नावाचा अर्थ प्रिय, उदार, सक्षम, प्रशंसनीय असा आहे.
8/ 8
अभिनेता विजय सध्या पिंकिंचा विजय असो मालिकेत काम करतोय. तर रुपालीनं कामातून ब्रेक घेतला असून मुलीचा सांभाळ करत आहे.