अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी 60 व्या वर्षी रुपाली बरूआबरोबर दुसरं लग्न केलं. दोघांच्या लग्नानंतर अनेक प्रश्न समोर आले.
2/ 11
आशिष यांचं पहिलं लग्न झालेलं असताना त्यांनी दुसरं लग्न कसं केलं, असे प्रश्न अनेकांनी विचारले. यावर आशिष यांची पहिली पत्नी राजोशी बरूआ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
3/ 11
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना राजोशी यांनी म्हटलं आहे की, "2021मध्ये आम्ही दोघे वेगळे झालो. मागील वर्षी आम्ही घटस्फोटासाठी अर्ज केला".
4/ 11
"हो आम्ही आमच्या घटस्फोटाची माहिती लोकांना दिली नव्हती. आम्ही आजही चांगले मित्र आहोत. त्यामुळे ही गोष्ट सर्वांना न सांगण्याचा निर्णय आम्ही घेतला".
5/ 11
"आशिषबरोबरचे मागचे 22 वर्ष माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिसत होते. तुम्ही याबद्दल आशिषला विचारू शकता. तो देखील हेच सांगेल".
6/ 11
राजोशी पुढे म्हणाल्या, "आशिष एक अमेझिंग पार्टनर आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र प्रवास केला. आमच्यात अनेक कॉमन गोष्टी होत्या. तसंच अनेक वेगळ्या गोष्टीही होत्या".
7/ 11
"आम्हाला एक गोड मुलगा आहे. त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात आशिषचं महत्त्वाचं योगदान आहे. लोकांना वाटतं की आईच मुलांसाठी सगळं काही करू शकते पण वडिलांची भूमिका देखील खूप मोठी असते".
8/ 11
"मी एक कलाकार आहे आणि काळानुसार मला काही गोष्टींची जाणीव झाली की काही गोष्टी मला थांबवू शकत नाहीत. मला कळलं की माझं आणि आशिषचं भविष्य वेगळं आहे. कोणत्याही नात्यात घुसमट करून घेण्यापेक्षा मी माझा आनंद निवडला".
9/ 11
"आशिषने माझी फसवणूक केली नाही. तर त्याच्या सपोर्टमुळे मी वेगळं होण्याचा निर्णय घेऊ शकले. आम्ही कोणत्याही भांडणांशिवाय वेगळे झालो आहेत".
10/ 11
"आजही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे खुश आहे".
11/ 11
"मला आता दुसरं लग्न करायचं नाही. पण प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी. त्याला गरज होती त्याने लग्न केलं. माझ्या शुभेच्छा त्याच्याबरोबर नेहमी असतील", असं त्या म्हणाल्या.