Samruddhi Kelkar : मालिका संपताच समृद्धी केळकरने उरकलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना शंका
स्टार प्रवाहवरील सगळ्यात जुनी मालिका 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र मालिका संपताच कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. तिच्या हातावर मेहंदी सजलेली पाहून कीर्तीने लग्न उरकलं का अशी शंका चाहत्यांच्या मनात आली आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं. डॅशिंग आयपीएस ऑफिसर ते शांत, संयमी सून अशी कीर्तीची दोन्ही रूपं प्रेक्षकांना भावली होती.
2/ 8
समृद्धी कीर्तीचा निरोप घेताना भावुक झाली होती. समृद्धीने सोशल मीडियावर मालिकेतील कीर्तीसाठी एक खास पोस्ट केली होती.
3/ 8
मालिका संपताच कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.
4/ 8
समृद्धीच्या हातावर मेहंदी सजली आहे. समृद्धी केळकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात समृद्धीच्या हातावर मेहंदी सजली आहे.
5/ 8
पण ही तिच्या लग्नाची मेहंदी नसून तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची मेहंदी आहे.
6/ 8
समृद्धीने हे फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘ताईचं लग्न’ असं कॅप्शन दिलं आहे.
7/ 8
या फोटोंमध्ये समृद्धी तिच्या बहिणीबरोबर पोझ देताना दिसत आहे.
8/ 8
तिचे हे फोटो पाहून आधी मात्र चाहत्यांनी तिच्याच लग्नाचा अंदाज बांधला होता. तशा कमेंट देखील या पोस्टवर केल्या आहेत.