Home » photogallery » entertainment » PHOTOGALLERY WARINA KHAN DEBUT IN BOLLYWOOD WITH SALMAN KHAN FILMS LOVEYATRI ACTRESS TROLLED FOR BEING AFGHANI PR TRANSPG
Loveyatri फेम अभिनेत्री वरिना हुसेनला अफगाणी असल्याने केलं होतं ट्रोल; सौंदर्याने जिंकली होती चाहत्यांची मनं
अफगाणी अभिनेत्री वरिना हुसेनची (Warina Hussain)भारतात मोठी फॅनफॉलोइंग आहे. 'लव्हयात्री' (Loveyatri) चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण अफगाणी असल्याने तिला ट्रोलही केलं जात होतं.
|
1/ 11
कॅडबरीच्या जाहीरातीने प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री वरिना हुसेन आता एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. लवयात्री या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण अफगाणीस्तानी असल्याने तिला मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं.
2/ 11
वरीनाची आई अफगाणी आहे तर वडिल इराकी आहे. दरम्यान वरिनाचं बालपण आणि शिक्षण हे अमेरिकेत झालं होतं. सुरूवातीला तिला निर्माते काम देण्यासाठी नकार देत असत.
3/ 11
लव्हयात्री प्रदर्शित झाल्यानंतर वरिनाने सांगितलं होतं की, ती जेव्हा भारतात आली व चित्रपटांत काम शोधू लागली तेव्हा तिला फार संकटाचा सामना करावा लागला होता. आतंकी देशातील मुलगी म्हणून तिला हिनवलं जायचं असंही तिने म्हटंल होतं.
4/ 11
आपल्या आईकडून आणि आजीकडून आपण जुन्या अफगाणीस्थान विषयी अनेक स्टोरी ऐकल्या असल्यांचही तिने म्हटलं होतं.
5/ 11
वरीनाने सांगितलं की, अफगाणीस्थानचे लोक बॉलिवू़ड चित्रपट फार पाहातात व पसंत करतात.
6/ 11
वरिनाने सलमान खान प्रोडक्शनच्या लव्हयात्रीतून आयुष शर्मासोबत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती दबंग ३ च्या एका आयटम साँगमध्ये दिसली होती.
7/ 11
वरिनाने न्यूयॉर्कमधून फिल्म अकॅडमीतून शिक्षण घेतलं होतं. अनेक जाहीरातीत तिने मॉडेलिंग ही केलं. तिच्या सौंदर्याने तिने अनेकांची मनं जिंकली होती.
8/ 11
त्यानंतर वरिना जास्त चित्रपटांत दिसली नाही.
9/ 11
वरिना तिच्या सौंदर्यासाठी फारच प्रसिद्ध आहे.
10/ 11
काही महिन्यांपूर्वी तिने तिचे सोशल मीडिया अकाउंट्स बंद केले होते.
11/ 11
वरिना हुसैन लवकरच ‘द इंनकम्प्लीट मॅन’मध्ये दिसणार आहे. याशिवाय एका साउथ चित्रपटातही दिसणार आहे.