हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे एक मराठी मुलगी आहे. त्यामुळे अंकिता महाराष्ट्रातील प्रत्येक सण पारंपरिक वेशात मोठ्या उत्साहाने साजर करते. गणपती येऊन आजचा तिसरा दिवस आहे. आज घरामध्ये गौराईचं आगमन झालं आहे. अंकिताच्या घरातदेखील गौरीची स्थापना करण्यात आली आहे. अंकिताने सुंदर फोटोसुद्धा शेयर केले आहेत. अंकिताने सुंदर फोटो शेयर करत सर्वांना आपल्या घरातील गौराईचं दर्शन दिल आहे. अंकिताच्या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.