Shahrukh Khan: शाहरुख खानच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये तैनात आहेत लेडी बॉडीगार्ड्स; कारण वाचून कराल सलाम
शाहरुख खान सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. नुकतंच त्याच्या 'पठाण' चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. तर दुसरीकडे त्याच्या आगामी 'जवान' सिनेमाचीही तेवढीच चर्चा आहे. अशातच कालपासून शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोतील शाहरुखचा लूक एखाद्या तरुणालाही लाजवेल असा आहे. लाखो मुली आजही त्याच्यासाठी वेड्या आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की किंग खान त्याच्या सुरक्षेसाठी महिला अंगरक्षक ठेवतो. त्यामागचं कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल...
4 वर्षांनंतर पठाणच्या रुपात परतलेल्या शाहरुख खानने तोच खरा किंग खान असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पठाण या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
2/ 9
आपल्या अभिनयाने किंग खानने सर्वांना आपले वेड लावले आहे. याआधीही शाहरुखने अनेक पात्रांनी करोडो मुलींची मने जिंकली आहेत
3/ 9
पण तुम्हाला माहित आहे का की अनेक मुली स्वतः किंग खानच्या संरक्षणासाठी तैनात आहेत.
4/ 9
शाहरुख खानकडे अनेक महिला अंगरक्षक आहेत, याबद्दलचा खुलासा एकदा शाहरुख खाननेच केला आहे.
5/ 9
याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता कि, 'महिला माझ्या जास्त दिवान्या आहेत. मी जेव्हाही बाहेर जातो तेव्हा त्यांना मला जवळून पाहायचं असतं, मिठी मारायची असते.'
6/ 9
तो पुढे म्हणाला कि, 'मला ते असभ्य वाटायचे जेव्हा पुरुष अंगरक्षक माझ्या संरक्षणाचा प्रयत्न करत असताना महिलांना धक्काबुक्की करत असत.ते मला कधीही आवडलं नाही. म्हणूनच मला महिला अंगरक्षक ठेवणे अधिक योग्य वाटले.'
7/ 9
शाहरुखच्या या खुलाश्यानंतर त्याच्याबद्दल चाहत्यांना आश्चर्य तसेच कौतुक देखील वाटले होते.
8/ 9
शाहरुखने अलीकडेच 'पठाण' चित्रपटाद्वारे चार वर्षांहून अधिक काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला.'
9/ 9
शाहरुख आता जवान या चित्रपटात दिसणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट आहे. यानंतर शाहरुख खान डंकी या चित्रपटात दिसणार आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल.