बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. त्यामुळे तिचे चाहते तिला मिस करत असतात. परंतु अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. अभिनेत्री गेली अनेक दिवस परदेश दौऱ्यावर आहे. ती सतत आपले व्हेकेशन फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ करत आहे. नुकताच परिणीतिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.यामध्ये ती युरोप दौऱ्यावर असल्याचं दिसत आहे. परिणीति चोप्राने सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 2021 चे आभार मानले आहेत. अर्थातच अभिनेत्रीला अनेक चांगल्या आठवणी या वर्षात मिळालेल्या असणार आहेत. सध्या अभिनेत्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. परिणीति चोप्रा चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. चाहते तिच्या पोस्ट फारच पसंत करतात. त्यामुळेच तिची इन्स्टाग्राम फॅमिली मोठी आहे. अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर तब्बल 34.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.