बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्थशास्त्र आणि फायनान्समध्ये ट्रिपल ऑनर्स मिळवलेल्या परिणितीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्थशास्त्र आणि फायनान्समध्ये ट्रिपल ऑनर्स मिळवलेल्या परिणितीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2/ 8
२२ ऑक्टोबर १९८८ ला अंबालामध्ये जन्मलेल्या परिणीती चोप्राला भारतातून बाहेर आपलं करिअर घडवायचं होतं. मात्र नशिबाने तिला बॉलिवूडमध्ये आणलं.
3/ 8
२०११ मध्ये परिणीती चोप्राने 'लेडीज व्हर्सेस रिकी बेहेल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये ती रणवीर सिंहसोबत झळकली होती. मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून यामध्ये अनुष्का शर्मा होती.
4/ 8
त्यांनतर मुख्य अभिनेत्री म्हणून परिणीती चोप्राचा पहिला चित्रपट 'ईशकजादे' हा होता. हा चित्रपट प्रचंड पसंत केला गेला होता. यातील गाणीसुद्धा खूपच गाजली होती. या चित्रपटात सहकलाकार म्हणून अर्जुन कपूर होता.
5/ 8
अभिनेत्री परिणीती चोप्राचा जन्म हरियाणामधील 'अंबाला'येथे झाला होता. ती अभ्यासात फारच हुशार होती. १२ मध्ये ती देशात अव्वल आली होती. राष्ट्र्पतींच्या हस्ते तिचा सन्मानदेखील करण्यात आला होता.
6/ 8
परिणीतीला इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये आपलं करिअर करायचं होतं. त्यांनतर तिने मँचेस्टर फायनान्समध्ये कोर्सदेखील केला. इतकंच नव्हे तर तिने इकॉनॉमिक, फायनान्स आणि बिजनेसमध्ये डिग्रीही घेतली आहे.
7/ 8
शिक्षण पूर्ण झाल्यांनतर ती इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजर म्हणून जॉबदेखील करू लागली होती. मात्र २००९ मध्ये आलेल्या मंदीने सर्वकाही बदलून टाकलं. तिला भारतात परत यावं लागलं. इथे येऊन अनेक डिग्र्या असूनदेखील तिला मनासारखा जॉब मिळत नव्हता.
8/ 8
त्यामुळे परिणीतीने यशराज स्टुडिओमध्ये पीआर कन्सल्टन्ट म्हणून काम सुरु केलं होतं. त्यांनतर तिने बॉलिवूडमध्ये एक अभिनेत्री म्हणून स्वतःला स्थापित केलं आहे.