'पहिले न मी तुला' या मालिकेतून मनूच्या रूपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तन्वी मुंडले होय. 'पाहिले न मी तुला' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी तन्वी नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तन्वीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे. लाल आणि पांढऱ्या साडीमध्ये तन्वी फारच ग्लॅमरस दिसत आहे. शिवाय तिच्या निखळ हास्याने तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. तन्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. 'पहिले न मी तुला' या पहिल्याच मालिकेमुळे तन्वी प्रचंड लोकप्रिय झाली होती. मूळची सिंधुदुर्गची असणारी तन्वी कामानिमित्त मुंबईत आली आहे. तन्वी मुंडले लवकरच नव्या मालिकेत झळकणार आहे.