

छोटा पडदा अफेअर, ब्रेकअप, प्रेम आणि लग्न या सगळ्यामध्ये बॉलिवूडपेक्षा काही कमी नाही. मात्र छोटा पडदा याबाबतीत दोन पावलं पुढेच आहे. मालिकेत भावा- बहिणींची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत होते.


‘ये रिश्ता त्या कहलाता है’ या प्रसिद्ध मालिकेत रोहन मेहरा आणि कांची सिंह हे दोन्ही कलाकार बहिण- भावाची व्यक्तीरेखा साकारत होते. मात्र पडद्यामागे दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. याच कारणामुळे निर्मात्यांनी या दोघांनाही मालिकेतून काढून टाकलं.


सात वर्षांपूर्वी २०१२ मध्ये स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका ‘एक वीर की अरदास वीरा’मध्ये दिगंगना सूर्यवंशीने मुख्य भूमिका साकारली होती. यात शिविन नारंगने तिच्या भावाची व्यक्तीरेखा साकारली होती. दोघ एकमेकांना डेट करत होते. यानंतर दिगंगनाने टीव्हीसृष्टीला अलवीदा म्हटलं आहे. अनेक महिन्यांनी ती बिग बॉसमध्ये दिसली होती.


‘ये है मोहब्बतें’ या प्रसिद्ध मालिकेत अदिती भाटिया आणि अभिषेक वर्मा या दोघांनी बहीण- भावाची व्यक्तिरेखा साकारली. मात्र आजही दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.


२०१८ मध्ये ऑफ एअर गेलेली ‘तू सूरज में सांझ पियाजी’ मालिकेत रिया शर्मा आणि मयंक वर्मा यांनी पडद्यावर बहीण- भावाची व्यक्तिरेखा साकारली होती. शुटिंगदरम्यान दोघं एकमेकांसोबत खूप वेळ घालवायचे. तसंच शूटिंग संपल्यानंतरही दोघं अनेकदा बाहेर फिरायला जायचे. असं म्हटलं जायचं की दोघं एकमेकांना डेट करत होते.