तृणमुल काँग्रेसची (TMC) खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे भलतीच चर्चेत आली आहे.
2/ 6
तिच्या लग्नावरून सध्या मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. अलिकडेच तिनं धुमधडाक्यात केलेलं लग्न नाकारलं होतं. दरम्यान आता ती गरोदर असल्याची बातमी समोर येत आहे.
3/ 6
नुसरतनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचं बेबी बंब दिसत आहे. मात्र हे फोटो राहून काही नेटकरी तिच्यावर जोरदार टीका करत आहेत.
4/ 6
दयाळूपणा सर्व काही बदलून टाकतं अशा आशयाची कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले होते. मात्र यावर चित्र विचित्र कॉमेंट सध्या टीकाकार करत आहेत.
5/ 6
“पतीला फसवून तुला काय मिळालं”, “खरं सांग हे मुल कोणाचं आहे?”, “तुझ्याकडे कुठल्या प्रकारचा दयाळूपणा आहे.” अशा आशयाच्या प्रतिक्रिया देत काही नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.
6/ 6
निखिल जैनने (Nikhil Jain) आधीच या प्रेग्नंसी विषयी खुलासा करत आपल्याला याविषयी काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं. तसेच त्या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून वादविवाद सुरू असून ते 6 महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहत आहे. त्यामुळे हे मुलंही त्याचं नसल्यांचा दावा त्यानं केला आहे.