आपल्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करणाऱ्या अभिनेत्रीशी त्यानं केलं लग्न; सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या या बंगाली खासदाराच्या लग्नाची गोष्ट
लोकसभेतल्या सर्वांत सुंदर खासदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नुसरत जहाँ यांनी निवडणुका झाल्या झाल्या लग्न केलं. त्यांचा पती कोण आहे आणि करतो काय? त्यांच्या लग्नाची रंजक गोष्ट


सर्वांत सुंदर खासदार अशी ओळख बनत असलेल्या नुसरत जहाँ यांची कोलकाता आणि दिल्लीतच नाही तर देशभर चर्चा आहे.


तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री असणाऱ्या नुसरत जहाँ यांनी निवडणूक झाल्या झाल्या लग्न केलं. त्या शाही विवाहाचे फोटोही व्हायरल झाले.


नुसरत जहाँने पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. त्यानंतर त्यांचा लोकसभेतला वावर नेहमीच लक्षवेधी राहिला आहे.


त्यांच्या शाही लग्नाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर त्या पहिल्यांदा लोकसभेत आल्या ते साडी, भांगात भरलेला सिंदूर, हातात सौभाग्य चुडा अशा वेशात. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली.


जून 25 ला नवनिर्वाचित खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्यावर नुसरत जहाँ यांनी शपथ घेतल्यानंतर वंदे मातरम् असंही म्हटलं.


जूनच्या पहिल्या आठवड्यात नुसरत यांनी उद्योगपती निखिल जैन यांच्याबरोबर लग्न केलं. नुसरत यांच्या पतीविषयीसुद्धा सध्या बराच सर्च केला जात आहे.


निखिल जैन कापड व्यावसायिक आहेत. त्यांची कोलकात्यासह चेन्नई, बेंगळुरू अशा पाच शहरांमध्ये मोठी दुकानं आहेत.


निखिल यांच्या रंगोली या ब्रँडसाठी नुसरत यांनी फोटो शूट केलं. रंगोलीच्या ब्रँड अँबेसीडर म्हणून नुसरत यांची नेमणूक झाली.


कोलकात्यात व्यवसाय करणाऱ्या निखिल यांचं शालेय शिक्षण कोलकात्यात झालं आणि त्यांनी ब्रिटनमधल्या वॉरविक युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिग्री घेतली.


लोकसभा निवडणुका झाल्यानंतर नुसरत जहाँ यांनी निखिल जैन यांच्याशी लग्न केलं. विवाहसोहळा झाला टर्कीमध्ये. हिंदू जैन पद्धतीने लग्न लागलं.


नुसरतने आपल्या राजेशाही लग्नासाठी टर्की हे डेस्टिनेशन निवडलं. १९ जून ते २१ जूनपर्यंत हे डेस्टिनेशन वेडिंग टर्कीत झालं.


१९ जूनला हिंदू पद्धतीने लग्न करण्यात आलं. त्याआधी १७ जूनला प्री-वेडिंगची धमालही करण्यात आली तर १८ जूनला संगीत ठेवण्यात आलं होतं.


नुसरतनं हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न करण्यासाठी तुर्की हे डेस्टिनेशन निवडलं होतं. तर तिचं ख्रिश्चन वेडिंगही तिथल्याच आसपासच्या लोकेशनवर झालं आहे.


नुसरत निखिलनं त्यांच्या ख्रिश्चन वेडिंगनंतर एक बीच पार्टीही ठेवली होती. ज्यात त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्र सहभागी झाले होते.


नुसरतने आपल्या लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लेहंगा घातला होता. तर निखीलने सब्यसानेच डिझाइन केलेली शेरवानी घातली होती.


राजकारणात येण्यापुर्वी नुसरतने मॉडेलिंग आणि अभिनयात आपलं नाणं खणखणीत वाजवलं. ८ जानेवारी १९९० मध्ये कोलकत्यात जन्मलेली नुसरत ही बंगाली सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.


नुसरतने २०१० मध्ये फेअर वन मिस कोलकताचा किताब जिंकला होता. यानंतर नुसरतने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं. तिच्या सौंदर्याची चर्चा बंगाली सिनेसृष्टीमध्ये एवढी झाली की तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या.


आपल्या आठ वर्षांच्या करिअरमध्ये तिने आतापर्यंत १९ सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर तिचा सेवेन हा सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.


नुसरतच्या लग्नातला हा तिच्या वडिलांबरोबरचा फोटो तिने शेअर केला होता. तोही सोशल मीडियावर सगळीकडे फिरला.