अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आपल्या नृत्यानेच नाही तर लुक्सनेही तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे. पाहा तिचे फोटो. ऑफ व्हाईट आणि लाल रंगाची किनार असणारी साडी नोराने परिधान केली आहे. नोरा यात केणत्याही राजकुमारी पेक्षा कमी दिसत नाही. नोराचा हा पारंपरिक थाट पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. नोरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नोरा मुळची भारतीय नाही. पण तिने स्वतःला मागील काही वर्षांत परिपूर्ण भारतीय बनवलं आहे. तिच्याकडे पाहून ती विदेशी असल्याचं अजिबात जाणवत नाही असे तिचे चाहते म्हणतात. मुळची मोरोक्कोची असलेली नोरा कॅनडात लहाणाची मोठी झाली होती. बालपणीपासूनच बॉलिवू़डचं आकर्षण असलेली नोरा करिअरसाठी भारतात आली होती. आपल्या नृत्याने तिने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळक निर्माण केली. लवकरच ती अक्षय कुमारच्या भुज या चित्रपटात दिसणार आहे.