प्रसिद्ध डान्सर, अभिनेत्री नोरा फतेही तिच्या नव्या अवतारात अगदी स्वप्नवत दिसत आहे. संपूर्ण गुलाबी लुक फारच हिट ठरत आहे. पाहा तिचे फोटो. गुलाबी रंगाच्या साडीत ती फारच आकर्षक दिसत आहे. डान्स दिवाने या शोमध्ये ती गेस्ट म्हणून दिसत आहे. त्यासाठी तिने पिंक लुक केला होता. नोरा तिच्या सौंदर्यासाठी आणि फिटनेसाठीही तितकीच प्रसिद्ध आहे. नुकतच तिचं जालिमा कोकाकोला हे गाणं प्रदर्शित झालं आहे. तिच्या डान्सने पुन्हा एकदा कमाल केली आहे. भूज- द प्राइड ऑफ इंडिया या चित्रपटात ती झळकणार आहे. नोराने नुकतेच सोशल मीडियावर इन्स्टाग्रामचे ३० मीलियन फॉलोवर्स पूर्ण केले आहेत. कमी काळातच नोराने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.